राष्ट्रसंत गाडगे महाराजांने देशभक्तीचा दिला होता संदेश!
बार्शीटाकळी (Aasra Mata Temple) : बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद बु.व दोनद खुर्द, या गावातील काटेपूर्णा नदी काठावर असलेल्या देवालयात, आसरा मातेच्या जय जय काराणे परिजय दुमदुमला आहे. बार्शीटाकळी पासून 18 ते 19 किलोमीटर अंतरावर दोनद बु.व दोनद खुर्द हे दोन गावे आहेत. या दोन गावाच्या मध्यभागातून काटेपूर्णा नदी वाहत असून खोल असा डोह आहे. या नदीच्या काठावर दोन्ही गावात आसरा मातेचे प्राचीन असे मंदिर आहेत. वर्षभर राज्यातील विविध भागातून असंख्य भक्तगण (Devotees) या तीर्थक्षेत्राला (Pilgrimage) भेट देऊन दर्शनाचा लाभ घेत, आपल्या मनोकामना पूर्ण करतात. सद्यस्थितीला नवरात्र चा काळ चालू असल्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात भक्तांची वर्दळ आहे.अ नेक भाविक भक्तगण या ठिकाणी कबूल नवस फेडण्यासाठी किंवा दर्शनासाठी येत असतात. रोज विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात.
देशासाठी संघटित होण्याचे आवाहन!
प्राचीन काळात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी या गावाला भेट देऊन गावात व मंदिर परिसरात ग्राम स्वच्छता केल्यानंतर त्यांचे कीर्तन झाले. सदर कीर्तनातून त्यांनी राष्ट्रभक्ती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती प्रथा परंपरा कशा घातक आहेत याची माहिती देत देत शेतीसाठी ब्रिटिशांना चले जाव याबरोबरच देशासाठी संघटित होण्याचे आवाहन केले अशा प्रकारची माहिती या गावातील वयस्कर लोक आजही अभिमानाने सांगतात.
मंदिर परिसरात नदीकाठावर घाट बांधण्यात आला!
विशेष म्हणजे गाडगे महाराजांनी सांगितल्यानंतर या मंदिर परिसरात नदीकाठावर घाट बांधण्यात आला. दोन्ही गावातील मंदिर परिसरात गाडगे महाराजांचे पुतळे बसविलेले आहेत. मंदिराचे विश्वस्त, गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीचे तथा गावातील व पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते इतर धार्मिक उत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव जल्लोषात व आनंदात पार पडतात. 30 सप्टेंबरला होम हवन हवन होतअसून एकदा तरी येथे दर्शनाचा येऊन लाभ घ्यावा. असे इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्यात.




