चिखली आगारामध्ये प्रवाशी राजा व पालक कामगार दिन साजरा
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Pravashi Raja day) : बुलढाणा विभागाचे विभाग नियंत्रक अशोककुमार महादेवराव वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली (Chikhali Agar Section) चिखली आगार विभागात १९ जुलै रोजी प्रवाशी राजा दिन व पालक दिन साजरा करण्यात आला असून प्रवाशांच्या १६ तर कर्मचाऱ्यांच्या १९ तक्रारीचा निपटारा करण्यात आला.
प्रवाशी राजा दिनानिमित्त (Pravashi Raja day) प्रवाशी वर्गाकडून बसेस सुरू करणे बाबत १२, बस थांब्यावर बस थांबवीने बाबत २ , बस स्थांनाकावरील खड्ड्याबाबत १ ,नो पार्किंग झोन बाबत १ ,अशा १६ तक्रारी तर रा .प . कर्मचारी त्यांच्या तक्रारी मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था २ , चालक-वाहक विश्रांती गृहाबाबत २ , प्रसाधन गृहाच्या समस्येबाबत २ चालक-वाहक विश्रांती गृहाबाबत , प्रसाधन गृहाच्या समस्येबाबत , महिला विश्रांती व प्रसाधन गृहाबाबत , रेस्ट रूम मध्ये सतरंज्या उपलब्ध करनेबाबत , आडनावात बदल करनेबाबत , बालसंगोपण रजेबाबत , फिक्स कामगिरी मिळणेबाबत , श्रेणीकरणाबाबत:-१ अतिरिक्त वापराबाबतः- बढतीपरीक्षेच्या दिवशी हजेरी मिळणेबाबत ,वैद्यकीय बिलाबाबत , अलोकेशन बाबत , चालक वाहक कर्मचारी यांच्या मधून लिपीक पदात पदोन्नती बाबत ,रा प गणवेशाबाबत अशा १९ तक्रारीचा निपटारा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विभागाचे विभाग नियंत्रक अशोककुमार महादेवराव वाडीभस्मे , विभागीय अभियंता (स्था)), अजय नाईक, सहा वाहतुक अधीक्षक हरिष नागरे , सहा. कार्यशाळा अधीक्षक चिखली आगार सुभाष जाधव , वाहतुक नियंत्रक सागर परदेशी , चिखली आगार वरिष्ठ लिपिक सौ सपना मगर, स्वप्नील गाडेकर वरिष्ठ लिपिक व इतर समस्त कर्मचारी व प्रवाशी यांचे समक्ष प्रवाशी राजा दिन व पालक कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक यांनी (Pravashi Raja day) प्रवाशी वर्गाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.




