गोंदिया (Gondia):- गोंदिया जिल्ह्यात पावसाळ्यात 96 गावांना पुराच्या पाण्याचा धोका संभवतो त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग (administration department) सज्ज झाला असून या विभागाद्वारे पावसाच्या परिस्थितीत शोध व बचावकार्य संबंधाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध जलाशयात(reservoir) शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा व बचाव तसेच पूर परिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली.
सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित
जिल्हा प्रशासनाकडून(district administration) जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूर परिस्थिती मध्ये सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारी 2024 च्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते (weather accounts)व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका व गाव पातळीवर व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात येत आहे.