हिंगोली (Dandiya Festival) : येथील आई जगदंबा नवरात्र उत्सव समिती एनटीसी हिंगोली च्या वतीने आयोजित गरबा-दांडिया पाच दिवशीय महोत्सवाला हजारो दांडिया रसिकांची (Dandiya Festival) उपस्थिती होती. चौथ्या दिवशीचे बक्षीस वितरण महिला समितीच्या हस्ते वितरित करण्यात आले.
आई जगदंबा नवरात्र उत्सव समिती एनटीसी हिंगोली व आई जगदंबा गरबा-दांडिया महिला समितीच्या पुढाकारांने हॉटेल शिवलिला पॅलेस येथे दि.२८ सप्टेंबर रोजी दांडिया रसिकांची प्रचंड गर्दी होती. या चौथ्या दिवशीच्या विजेत्यांना बक्षीस वितरण महिला समितीच्या वतीने करण्यात आले.
यामध्ये ० ते १४ वयोगटातील उत्कृष्ट सादरीकरण प्रथम क्रमांक कोमल गावंडे, द्वितीय कुंकू मानवतकर, तृतिय आरोही ठोंबरे, उत्कृष्ट वेशभुषा प्रथम विराज पाटील, द्वितीय रुद्र चौरसिया, तृतिय सोनाक्षी होकर्णे, उत्तेजनार्थ मिश्री खांडेल, नैतिक बियाणी, आराध्या भिसे, अनया मुंदडा, कुंमकुम झंवर, युवती गटातील उत्कृष्ट सादरीकरण प्रथम धनश्री जाधवर, द्वितीय अपेक्षा जाधव, तृतिय वैष्णवी ठाकुर, उत्कृष्ट वेशभुषा प्रथम निकीता खिल्लारे, द्वितीय ओवी बंधु, तृतिय करुणा चौधरी, उत्तेजनार्थ खुशी गायकवाड, श्वेता चौंदते, धनश्री डहाळे, अनुराधा वाव्हळे, स्वरांजली बांगर, महिला गट उत्कृष्ट सादरीकरण प्रथम क्रमांक वैशाली पाटील, द्वितीय प्रिया शिंदे, तृतिय राखी चौरसिया, उत्कृष्ट वेशभुषा प्रथम वर्षाराणी सोनुने, द्वितीय पल्लवी गायकवाड, तृतिय स्वानंदी देशमुख, उत्तेजनार्थ माधुरी भोसले, जाई गायकवाड, योगिता यादव, नेहा पांडे, प्रार्थना अचलिया, युवक गट उत्कृष्ट सादरीकरण प्रथम प्रेम मस्के, द्वितीय अभिनव मानवतकर, तृतिय मनोज भगत, उत्कृष्ट वेशभुषा प्रथम संस्कृत कांबळे, द्वितीय लखन चौधरी, तृतिय दिग्विजय वाकळे, उत्तेजनार्थ राजकुमार मोरगे, विवेक हनवते, अक्षय वानखेडे, ॠषिकेश घुगे, समर्थ बांगर, कपल गटामध्ये प्रथम गायत्री सोनु गोळवे, द्वितीय दिपाली दिपक सोनटक्के, तृतिय प्रतिक्षा अक्षय खंडेलवाल, उत्कृष्ट वेशभुषा प्रथम धनश्री दिग्विजय वाकळे, द्वितीय अमृता श्रीकांत गवते, तृतिय प्रियंका संदीप लोंढे, प्रोत्साहनपर अश्विनी विक्रम जगताप, स्वाती कुलदिप पांडे, मंदाकिनी भगवान चव्हाण, पुष्पा भाऊराव शेळके व मंगल सदानंद इंगळे यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. महोत्सव यशस्वीतेसाठी समिती प्रमुख माया गवळी, उप समिती प्रमुख दिपा भक्कड, समिती सदस्या छाया मगर, मालती कोरडे, योगिता देशमुख, शितल बोरकर, प्रिती खंडेलवाल, शिल्पा नरसीकर, ज्ञानदा रोकडे-चौधरी, श्रृती देशपांडे, निकीता जगताप, प्रियल देशमुख, मोहिनी इंगोले, पल्लवी ढाले, पुजा चौरसिया, डॉ.राधिका देशमुख, सायली इंगळे, सपना राऊत, अश्विनी बुर्रेवार, निकीता खिल्लारे, चंदा बांगर, विद्या पवार, वंदना भुसांडे, सिंधु राठोड, ज्योती कोथळकर, कांचन सोनार, जया पवार, नेहा सोमानी, मनिषा डहाळे, राखी झंवर, उमा शिंदे, राधा बियाणी, मोनिका साहु, सुनिता भंडगे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.