नवी दिल्ली/ मुंबई (Elections 2024) : देशात सध्या सुरू असलेल्या (LokSabha Elections) लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज मंगळवारी पूर्ण झाले. दुपारी 12 वाजेपर्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मतदानाला 1 वाजल्यानंतर उत्साहात वेग आला, त्यानंतर आज तिसऱ्या टप्प्यात 61.45 टक्के मतदान झाले.
महाराष्ट्राच्या 11 जागांवर मतदान
तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या 25 जागा, (Maharashtra Election) महाराष्ट्राच्या 11 जागा, उत्तर प्रदेशच्या 10 जागा, कर्नाटकच्या 14 जागा, छत्तीसगडच्या 7 जागा, मध्य प्रदेशच्या 9 जागा, बिहारच्या 5 जागा, आसाम आणि पश्चिम बंगालच्या 4 जागा- गोव्यातील 4 आणि सर्व 2 जागांसाठीही मतदान झाले. केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या दोन जागांवरही मतदान पार पडले.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.19 टक्के मतदान
सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक 74.86 टक्के मतदान (Elections 2024) आसाममध्ये झाले असून, (Maharashtra Election) महाराष्ट्रात सर्वात कमी 53.40 टक्के मतदान झाले आहे. तर बिहारमध्ये 56.01%, छत्तीसगडमध्ये 66.87%, दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये 65.23%, गोव्यात 72.52%, गुजरातमध्ये 55.22%, कर्नाटकात 66.05%, मध्य प्रदेशात 62.28% आणि उत्तर प्रदेशात 5.3% पश्चिम बंगालमध्ये ७३.९३ टक्के मतदान झाले.
दुपारी 3 वाजेपर्यंत 50.71 टक्के मतदान
यापूर्वी दुपारी 3 वाजेपर्यंत 50.71 टक्के मतदान (Elections 2024) झाले होते. आसाममध्ये 63.08%, बिहारमध्ये 46.69%, छत्तीसगडमध्ये 58.19%, दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 52.43%, गोव्यात 61.39%, गुजरातमध्ये 47.03%, कर्नाटकात 54.20%, मध्य प्रदेशात 54.26%, मध्य प्रदेशात 54.03% महाराष्ट्रात %, उत्तर प्रदेशात 46.78% आणि पश्चिम बंगालमध्ये 63.11% मतदान झाले.