महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, तहसीलदारांना निवेदन देऊन व्यक्त केला रोष
अमरावती (Public Safety Bill) : महाराष्ट्र सरकार नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक पारित केले आहे, सदर जन सुरक्षा विधेयक अर्बन नक्षलवादासाठी आहे म्हणून सर्वप्रथम असल्याचा गवगवा करण्यात आला. त्यानंतर अर्बन नक्षलवाद हा शब्द गाळून (Public Safety Bill) जन सुरक्षा विधेयक विधानसभेत गोंधळात पारित करून घेतले. परंतु लोकशाही आणि संविधानाच्या विचारावर काम करणाऱ्या सामाजिक संघटना, संस्था, व्यक्ती, पत्रकार, सेवाभावी संस्था, शेतकरी कष्टकरी मजुरांच्या व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अविरत काम करणाऱ्या संघटना, यांची खऱ्या अर्थाने गळचेपी करण्याचं कारस्थान महायुती सरकारने या निमित्ताने रसले असल्यास आरोप तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस तिवसा यांच्या वतीने आज तिवसा येथील शहीद स्मारकावर करण्यात आला.
रद्द करा! रद्द करा! जनसुरक्षा विधेयक रद्द करा!
या (Public Safety Bill) विधेयकामुळे लोकशाही व संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर न करता सरकारने जर काही चुकीचे धोरण अवलंबली तर त्याला विरोध करता येणार नाही सरकारला वाटले तर त्या संघटनांवर त्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करून त्यांना जेलवारी करण्याचे नियोजन या विधेयकात आहे.
जनसुरक्षा च्या नावाखाली हा कायदा आणला जाऊन लोकांना सुरक्षित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना व माहितीच्या अधिकारात काम करणाऱ्यांना असुरक्षित करणारा हा कायदा असून या (Public Safety Bill) विधेयकाची आज दिवसा तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी होळी करून, लोकशाही व संविधानाच्या गडचेपी करणाऱ्या महायुती सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे तहसीलदार तिवसा यांना निवेदन देऊन हे विधेयक मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने विविध संस्था व संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले होते.
यावेळी तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष, नगरसेवक वैभव स. वानखडे, शहर अध्यक्ष सेतू देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी राऊत, खरेदी-विक्री संचालक प्रमोद वानखडे, भाकपचे प्रकाश सोनोने, शहर कार्याध्यक्ष सुनील बाखडे, खरेदी-विक्री संचालक सचिन सोटे, खरेदी-विक्री संचालक प्रफुल बायस्कर, निलेश खुळे,संचालक प्रवीण साबळे , गटनेते किसन मुंदाने, जसबीर ठाकूर, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने, दिवाकर भुरभुरे, अतुलभाऊ गवड, मुकुंद पुनसे, नगरसेवक अमर वानखडे, पांडुरंग खेडकर, गजानन भोंबे, अंकुश देशमुख, प्रणव गौरखेडे, उमेश राऊत, दिनेश देशमुख, अंकुश ढेवले, हरिदास भगत, सुरज धुमनखेडे, अजय गोरडे, अतुल खुळे, अजय आमले, संजय चौधरी, प्रशांत प्रधान, सुरेश उईके, सागर राऊत, वैभव काकडे, आशिष ताथोडे, आकाश मकेश्वर, अनिकेत प्रधान, स्वप्निल गंधे, रोहन वानखडे, गोपाल पडोळकर, दीपक पडोळकर, गौरव चौधरी, अजय बाखडे, तुषार लेवटे, नारायण गोहत्रे, दीपक खैरकर, प्रमोद वनवे, अनंत शेंद्रे, निलेश खैरकार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.