पुसद (Pusad Youth suicide) : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोपरा येथे दि. 9 सप्टेंबरच्या दुपारी अंदाजे साडेतीन वाजताच्या दरम्यान राहत्या पडक्या घरात बल्लीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Youth suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार,1 सप्टेंबर पुसद तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्यामुळे कोपरा येथेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
सदर झालेल्या नुकसानीची अजून पर्यंत ही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे व या घटनेचा मानसिक आघात झाल्याने या 24 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. येथील समाधान संतोष पाईकराव वय 24 वर्ष रा. कोपरा वार्ड क्रमांक एक असे आत्महत्या (Youth suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे.या युवकाने त्याच्या राहत्या पडक्या घरात बल्लीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुसळधार पावसामुळे कोपरा गावातील नाल्याला पूर येऊन त्याने प्रचंड नुकसान केले. यामध्ये मृतक समाधान संतोष पाईकराव यांच्या घराच्या भिंती अक्षरशः वाहून गेल्या.
परिस्थिती एवढी बिकट की , दोन वेळेचे जेवणही गावकऱ्यांमार्फत देण्यात येत होते. अखेर घरातील कर्ता करवता मुलगा समाधान संतोष पाईकराव हा रोज मजुरी करू लागला. घटनेच्या दिवशी म्हणजेच आज काम झाल्यानंतर दुपारचे जेवण झाल्यानंतर बाहेर गेला व आलाच नाही , सोबतच्या व्यक्तींनी व घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता , तो त्याच्या राहत्या घरातील बल्लीला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घरच्यांनी तात्काळ समाधान संतोष पाईकराव यास खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (Youth suicide) मृतदेहाचे पोस्टमार्टम उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात केल्या जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.