हिंगोली (Hingoli) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र व नेहरू युवा केंद्र (Nehru Youth Centre), युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार (Ministry of Sports Government of India) यांच्या वतीने 5 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या युवा उत्सवामध्ये पुष्यमित्र जोशीने उत्कृष्ट कामगिरी करत ५ पदकांना गवसणी घातली आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान आधारित संशोधन, वक्तृत्व, यूथ आयकॉन आदींचा समावेश आहे. युवा उत्सवामध्ये सांघिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात नेतृत्व करत उत्कृष्ट प्रदर्शन पुष्यमित्रने केले आहे.
पुष्यमित्र जोशीने अनेक मानांकित स्पर्धांचे विजेतेपद पटकावलेले आहे
या आधी देखील पुष्यमित्र जोशीने अनेक मानांकित स्पर्धांचे विजेतेपद पटकावलेले आहे. संशोधक, वैज्ञानिक व उत्कृष्ट वक्ता म्हणून ख्यातनाम असलेल्या पुष्यमित्रने याआधी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज (Maharashtra Student Innovation Challenge), महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, स्वच्छ तंत्रज्ञान स्पर्धा, आविष्कार वैज्ञानिक संमेलन आदींचे विजेतेपद पटकावले आहे. पुष्यमित्र जोशीची ब्रिक्स संघटनेच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वर्किंग ग्रुपमध्ये युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. त्याचप्रमाणे पुष्यमित्रची वयाच्या 25 वर्षी तसेच प्रतिष्ठित इंडीयन सायन्स काँग्रेसच्या सायन्स कम्युनिकेटरपदी निवड झाली होती. नुकतेच त्याच्या 2 संशोधनाला पेटंट देखील मिळाले आहे. आजपर्यंत पुष्यमित्रचे 20 पेक्षा अधिक शोधनिबंध (Research Paper) आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये (International Journal) प्रकाशित झाले आहेत व ३ पुस्तकांचे लिखाण देखिल पुष्यमित्रने केले आहे. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांचे विजेतेपद देखील त्यानी मिळवले आहे