हिंगोली (Hingoli District Hospital) : येथील शासकीय जिल्हा रुग्णालय लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत होणार आहे. या बाबतचा करार संचालक स्तरावर पूर्ण झालेला आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक (Hingoli District Hospital) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हिंगोली जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले.
वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी देतांना या (Hingoli District Hospital) महाविद्यालयाचे स्वतःचे मोठे रुग्णालय असावे किंवा महाविद्यालयाशी काही मोठे रुग्णालय संलग्नित असावेत, असा केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचा दंडक आहे. हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एवढे मोठे रुग्णालय उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा रुग्णालय या महाविद्यालयाला हस्तांतरीत करण्याचा करार संचालक वैद्यकीय शिक्षण विभाग व संचालक आरोग्य सेवा यांच्या दरम्यान यापूर्वीच झालेला आहे. या करारानुसार हिंगोलीचे जिल्हा रुग्णालय १ एप्रिलपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात जाऊ शकते.
जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात गेल्यास (Hingoli District Hospital) रुग्णालयाला अधिक मनुष्यबळ मिळणार आहे. महाविद्यालयात वैद्यक शाखेतील प्रत्येक विभागात विविध तज्ञ डॉक्टर्सची नेमणुक झालेली असते. अशा तज्ञ डॉक्टर्सच्या सेवा जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळू शकतात. याच बरोबर जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात गेल्यास काही अडचणी सुध्दा निर्माण होऊ शकतात.
सामान्य रुग्णालयात रूग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान, उपचार आवश्यकता असल्यास शैल्यक्रिया सुध्दा विनाशुल्क केली जात असते; परंतु वैद्यकीय महाविद्यालयात या सर्व सुविधांसाठी विशिष्ट शुल्क ठरलेला असतो. आजच्या परिस्थितीत रक्ताच्या चाचण्या व सिटीस्कॅन सारख्या सुविधा विनाशुल्क आहेत. या सुविधांना वैद्यकीय महाविद्यालयात मात्र शुल्क लागणार आहे. यामुळे सर्व (Hingoli District Hospital) सामान्य रुग्णांची नाराजी होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालयातही जेष्ठ नागरीक, दारिद्र्य रेषेखालील रुग्ण, शासकीय कर्मचारी व अन्य काही संवर्गांना सूट असली तरी सर्वसामान्य गरीब रुग्णांना मात्र शुल्काचा फटका बसल्यास या रुग्णांची नाराजी होऊ शकते.