बेला येथील महामार्गावरील घटना
भंडारा () : शहराजवळील बेला येथे एका हॉटेलसमोर महामार्गावर दि.२७ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता दरम्यान ट्रक-बोलेरो यांच्यात आमोरासमोर भीषण अपघात घडला. त्यात बोलेरोमधील चार जणांचा जागीच अंत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. (Bela Bolero Accident) जखमीला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत्यूशी झुंज देत आहे.
मृतकांमध्ये अशोक फुलचंद जहरवाल (४८) रा. नागपूर, शैलेंद्र लेखराम बघेले (३४) रा.खापरी नागपूर, शैलेंद्र पन्नालाल गोकुलपूर (४०) रा. वायुसेनानगर नागपूर, मुकेश विजेवार (३२) रा.वाडी नागपूर अशी मृतकांची तर नाम अविनाश नाकतोडे (४०) रा.खापरखेडा नागपूर असे जखमीचे नाव आहे. नागपूर येथील मृतक व जखमी हे बोलेरो वाहन क्र.एम.एच.२७/ए.आर.६१९८ या गाडीने नागपूरकडे जाण्यास निघाले. (Bela Bolero Accident) भंडारा ओलांडल्यानंतर नागपूरकडे जात असताना रात्री ९.४५ वाजता दरम्यान बेला गावाजवळील हॉटेल साईप्रसाद समोर विरूध्द दिशेने येणारा ट्रक क्र.यु.के.१८/सी.ए. ८०५९ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून बोलेरो वाहनाला चिरडले. यात बोलेरो वाहनातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. भंडारा पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून जखमीला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी वाहतूक नियंत्रण पोलीस यांनी सुध्दा घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन बाजुला केले व काही वेळेनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. (Bela Bolero Accident) अपघाताची भिषणता लक्षात घेता घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पोलिसांनी तत्परता दाखवित धडक देणारा ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचालकाला अटक केली आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.