मानोरा (Washim) :- तालुक्यातील इंझोरी बिट हद्दीत दि. २ मे रोजी पोलिसांचा ताफा पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मौजे चौस सौ उषा विनोद राठोड यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता३५०० रुपये व विनोद देविदास राठोड यांच्या किराणा दुकानामध्ये १९२५ असे एकूण ५४१५ रुपयाची देशी दारू (country liquor) जप्त केली. दोन्ही आरोपी विरुध्द पोलिसांनी कलम ६५ ( ई ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल
तसेच मौजे इंझोरी येथे जुगार रेड करून आरोपी संतोष विठ्ठलराव राखुंडे यांचेकडून रोख ९४० रुपये, वरली मटक्याचे चिठ्ठ्या जप्त करण्यात आली. तसेच मानोरा टाऊन मध्ये रेड करून आरोपी किशोर रमेश चक्रनारायण रा. इंझोरी यांचे जवळून वरली मटक्याचे चिठ्ठ्या व नगदी १२४० रूपये जप्त करून दोन्ही आरोपी विरुध्द कलम १२ ( अ ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक पोलीस उपनिरीक्षक सुभाष महाजन, सफो रवी राजगुरे, पोहवा मदन पुणेवार, पोलीस शिपाई मनीष अगलदरे, रोहन तायडे, चालक पोलीस शिपाई श्रावण राठोड यांनी केली.