दिड कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी अडकल्या!
परभणी (Rajasthani Multistate Fraud) : परभणीतील गंगाखेड तालुक्यात कमी वेळात अधिकचा नफा (Profit) देण्याचे आमिष दाखवून राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने गंगाखेड शहरातील असंख्य ठेवीदारांच्या ठेवी घेऊन पसार झाल्याने शहरातील ठेवीदारांच्या तब्बल दिड कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी क्रेडिट सोसायटीत (Credit Society) अडकल्या आहेत. याप्रकरणी ठेवीदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार 28 जून रोजी सायंकाळी उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांसह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (Crime of Fraud) दाखल करण्यात आला आहे.
आशयासह विविध मुदत ठेवीवार आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवणारी जाहिरात!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ या क्रेडिट सोसायटीच्या संचालक (Credit Society Director) मंडळांनी मोठा गाजावाजा करत गंगाखेड शहरात राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा सुरू करून येथे गुंतवणूक करा, भरघोस फायदा घ्या. अशा आशयासह विविध मुदत ठेवीवार आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष (Bait) दाखवणारी जाहिरात केली होती. यावरून एसटी महामंडळातुन (ST Corporation) सेवानिवृत्त झालेले परभणीच्या गंगाखेड शहरातील कर्मचारी हनुमान त्र्यंबकराव देशमुख वय 69 वर्ष रा. भंडारी कॉलनी यांनी व अन्य लोकांनी लाखो रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळीच्या गंगाखेड शाखेत जमा केली होती. जानेवारी 2024 मध्ये परभणीतील गंगाखेड शहरातील शाखा बंद झाल्याने सर्व ठेवीदारांनी चौकशी करण्यासाठी परळी येथील मुख्य शाखेत धाव घेतली असता राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळीचे संपूर्ण संचालक मंडळ ठेवीदारांचे पैसे घेऊन फरार झाल्याचे समजल्याने ठेवीदार हनुमान त्र्यंबकराव देशमुख वय 69 वर्ष रा. भंडारी कॉलनी गंगाखेड यांनी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद आग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लढढा, संचालक अशोक जाजू, सतिश सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, संचालिका प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, गंगाखेड शाखा व्यवस्थापक उदावंत आदींनी संगणमत करून आपसात कट रचून अधिकचे व्याजदर देण्याचे अमिष दाखवून गंगाखेड शहरातील सुमारे 42 पेक्षा अधिक ठेवीदारांचे 1 कोटी 58 लाख 76065 रुपयांपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक करून घेत ते पैसे परत न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याची फिर्याद दिल्यावरून शनिवार 28 जून रोजी उशिरा परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (Rajasthani Multistate Co-operative Credit Society) अध्यक्ष, सचिवांसह संचालक मंडळ अशा एकुण 14 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर व आर्थिक गुन्हे शाखेचे (Financial Offenses Branch) पोलीस अधिकारी (Police Officer of Financial Offenses Branch) करीत आहेत.




