पाथरी (Rasta Roko Andolan) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे,सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,शंभर टक्के पीक विमा अदा करण्यात यावा, नाथरा ढालेगाव रोड चे काम तात्काळ सुरू करावे व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थींचे हप्ते वितरित करण्यात यावी, या आणि इतर मागण्यासाठी (Rasta Roko Andolan) दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले .या आंदोलनात ज्ञानेश्वर काळे, शिवाजी लिपणे, भागवत शिंदे, रत्नमाला हरकळ, बाळासाहेब काळे यांचेसह शेकडो आंदोलकांनी सहभाग नोंदवला.