Nagpur murder case :- एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शाळेतून बाहेर पडताच गुंडांनी कारमध्ये कोडून त्याचे अपहरण केले दुसरीकडे गुलगा बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी लगेच पोलिस ठाणे गाठले त्यामुळे आता १० लाखाची खंडणी (Extortion)मागण्याची योजना रचून करण्यात आलेल्या अपहरणाचा पर्दाफाश होईल आणि एक-एक करील सर्वांना अटक होईल, या भीतीने हादरलेल्या आरोपीनी त्या विद्यार्थ्यांची गळा आवळून निघृण हत्या केली ही संतापजनक घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या (Police station)हद्दीत चनकापूर शिवारात बुधवारी सकाळी उघडकीस आली.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह घेऊन पोलिस ठाणे गाठले
आरोपीला फाशीची शिक्षा द्या, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातल चालवा, अशी संतप्त नागरिकानी मागणी लावून धरल्याने तनावाचे वातावरण होते जितू युवराज सोनेकर (११), रा वॉर्ड क्र २. चनकापूर, खापरखेडा असे हत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. बुधवारी जितूचा मृतदेह चनकापूर शिवारातील झुडपाल आढळून आला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली, जितू हा सोमवारी शाळेबाहेर येताच बेपत्ता झाला होता. तो रात्री उशीरापर्यंत घरी पोहचला नव्हता. याबाबत आई निलिमाने पोलिसांना सुचना दिली होती. मात्र शेजारील गुंड प्रवृत्तीच्या युवकानेच आपल्या साथीदारासह प्लॅन रचल हत्या केल्याचे दोन दिवसानंतर समोर आले. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली यामध्ये आरोपी राहुल गौरीलाल पाल(२५), अरुण वैचू भारती (२५), यश गिरीश वर्मा (२१) सर्व रा. चनकापूर कॉलनी, खापरखेडा यांचा समावेश आहे. तिघांनीही संगणमत करून अपहरण व हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोगी राहुल पालहा मृतकाच्या शेजारी राहतो मृतक जितूच्या वडिलांकडे शेती विकून लाखो रुपये आल्याचे आरोपी राहुलचा समज झाला आणि त्याने साथीदारासह अपहरण व सांडणीची योजना आखली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला
प्राप्त माहितीनुसार, मृतक जितूचे वडील मूळचे साथीदारांना प्रत्येक हालचालीची माहिती देत होला मध्यप्रदेशातील पांढुर्णाजवळील बोतीयाचे रहिवासी आहे ते दोन चिमुकल्या मुलाच्या शिक्षणासाठी चनकापूरला राहायला आले ते चनकापूर येथे कुटुंबीयासह भाड्याने राहून भाजी विक्री करायचे मृतक जितूहात्यांचा दुसऱ्या नंबरचा मुलगा आहे यंदा जितू हा ६ व्या वर्गात शिकत होता. सोमवारी जितू हा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला. मात्र शाळा सुटल्यानंतर तो घरी परतला नव्हता काहींच्या माहितीप्रमाणे तो शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत रेल्वे फाटक, नाग मंदिरापर्यंत आलाहोता तेथेतो एका अनोळखी व्यक्तीशी बोलताना दिसला थोड्याच वेळात तो पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून निघून गेला, अशी चर्चा होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला. दरम्यान आरोपी राहुलसुद्धा कुटुंबीयासोबत जितूचा शोध घेण्याचे नाट्ध करीत आपल्या दरम्यान बुधवारी सकाळी ७ वाजता डब्ल्यूसीएल (WCL)कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला झुडपाल जितुचा मृतदेह दिसला यावेळी नागरीकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली काहीच क्षणात पोलिसानीही घटनास्थळ गाठले फॉरेन्सीक पथकही पोहचले. पंचनामा करुन मृतदेह (Dead body)नागपूर शासकीय रुग्णालयाल हलविण्यात आला.
सुरुवातीला हत्येचे नेमके कारण व आरोपी कोण हे स्पष्ट होत नव्हते. शेवटी पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास पद्धतीचा अवलंब करून आरोपीचा पर्दाफाश करीत तिघांना अटक केली. आरोपी हे अपहरणानंतर १० लाखाची खंडणी मागण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यापूर्वीच अपहरणाची तक्रार पोलिसांपर्यंत पोहचली याबाबत कुणकुण लागताच अपहरणकर्ते आरोपी हादरले.