मानोरा(Manora):- बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बाबत दि. २३ ऑगस्ट रोजी मतदार संघातील कारंजा येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये कारंजा व मानोरा शहरातील शाळा(School), कॉलेज(college), व्यापारी दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंद मध्ये सर्वांना सहभागी होणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.
बंद मध्ये सर्वांना सहभागी होणेबाबतचा निर्णय
या बैठकीला खा. संजय देशमुख, विधानसभा शिवसेना(UBT) विधानसभा संपर्क प्रमुख अनिल राठोड, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा जिल्हा प्रभारी देवानंद पवार,गणेश ठाकरे, गोपाल पाटील, दत्ता तुरक, सुभाष राठोड ,विलास सुरळकर,अमीर खान पठाण, प्रशांत सुर्वे, मुन्ना खान, युसुफ जठावाला, अनिस मौलाना, वैद भाई, हुसेन बंदुकवाले, नितीन गायकवाड, इशाद भाई, ॲड.निलेश कानकिरड, इमरान भाई फकिरावाले, सुभानभाई कामनवाले, रौफ मामु, बबलू शेख आदीसह काँगेस , शिवसेना उ. बा. ठा व रा. का. शरद पवार (Sharad Pawar)पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.