चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी दाखल नामांकन अर्जाची आज गुरूवारी छानणी प्रक्रीया सायंकाळ पर्यंत सुरू होती. उद्या शुक्रवार दि.१३ जूनला यादी जाहीर होणार असली तरी ज्या संस्था सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ब वर्ग ऑडीटमध्ये आलेल्या आहेत, अश्या संस्थामधील उमेदवारांचे नामांकन तुर्तास ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश राज्य सहकारी निवडझूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्याने यावर्षी ब वर्ग ऑडींटमध्ये आलेल्या संस्थामधील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्याने यावर्षी ब वर्ग ऑडींटमध्ये आलेल्या संस्थामधील उमेदवारांना मोठा दिलासा
चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या एकूण संस्थांपैकी निम्म्याहून अधिक संस्था या क वर्ग ऑडीटमध्ये (Audit) येत असल्याने अनेकांनी याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे दाद मागीतली होती. सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ज्या संस्थाचे ऑडीट ब वर्गात आले. त्यातील सभासदांनी नामांकन अर्ज दाखल केले मात्र बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करीत असतांना संस्था लगतच्या आर्थिक वर्षात अ किंवा ब वर्ग ऑडीट आवश्यक होते. परंतू लगतचे आर्थिक वर्ष कोणते यावरून वाद निर्माण होऊन संभ्रमावस्था निर्माण झाली. सन २०२३ – २४ हे आर्थिक वर्ष गृहीत धरण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती त्यामुळे सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षातील ब वर्ग ऑडीट संस्थामधून नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांबाबत काय निर्णय होईल याबाबत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
आज नामांकन अर्ज छानणीच्या दिवशी ज्या संस्था सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ब वर्ग ऑडीटमध्ये आलेल्या आहेत, अश्या संस्थामधील उमेदवारांचे नामांकन तुर्तास ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्याने यावर्षी ब वर्ग ऑडींटमध्ये आलेल्या संस्थामधील उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्या जाहीर होणार्या यादीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.