हिंगोली (Hingoli Education Department) : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात अपग्रेड (उच्चश्रेणी ) मुख्याध्यापकांची 100पेक्षा जास्त रिक्त पदे असल्याने या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार शाळेतील जेष्ठ शिक्षकांकडे देण्यात आला आहे त्यामुळे याचा परिणाम विदयार्थांची शैक्षणिक गुणवत्तेवर व प्रशासनावर होत आहे. त्याचबरोबर पदोन्नती होत नसल्याने उच्चश्रेणी पदोन्नतीसाठी पात्र असणारे शिक्षक पदोन्नतीपासुन वंचित राहत आहेत,पदोन्नती पात्र शिक्षक सतत संघटनेकडे पदोन्नतीसाठी तक्रार करत आहेत.
उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी संघटनांच्या वतीने (Hingoli Education Department) मुख्यकार्यकारी अधिकारी , शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे परंतु शिक्षणाधिकारी उच्चश्रेणी पदोन्नतीबाबत सर्वौच्च न्यायाल्याने दिलेल्या निकालाचे कारण पुढे करून पदोन्नतीसाठी टीईटी प्रमाणपत्र परीक्षा आवश्यक असल्याचे सांगत आहेत त्यामुळे पदोन्नतीपात्र जेष्ठ शिक्षक पदोन्नतीपासुन वंचित राहणार असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन पेदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोली येथे आले असता त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शिक्षण विभागातील प्रश्नांबाबत निवेदन देऊन चर्चा केली व प्रश्न सोडविण्यांची मागणी केली.
यामध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची सर्व रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, यासाठी टीईटीची अट रद्द करणे, सर्वोच्च न्यायाल्याने पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक असल्याचा जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाबाबत पुनर्याचिका शासनातर्फे दाखल करावी. (Hingoli Education Department) शिक्षकांना कॅशलेश योजना लागु करावी , जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक जादा वेतनवाढ व राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करणे.
जिल्हयात रिक्त असलेल्या शिक्षणाधिकारी , गटशिक्षण अधिकारी , विस्तार अधिकारी यांची रिक्तपदे भरणे ,नवनिर्मित सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी कार्याल्यातील लिपीक व सेवक पदाला मंजुरी देऊन पदे भरणे ,सेवानिवृत्त शिक्षकांची उपदान व अंशराशीकरण रक्कम त्यांच्या बॅक खात्यात जमा करणे , जिल्हयातील शिक्षकांना 24 वर्षानंतर देण्यात येणारी निवडश्रेणी मंजुर करणे ,मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ देणे यासह आदि मागण्यांचे निवेदन दिले व प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांना जिल्हा स्तरावरील प्रश्न सोडविण्यांचे सांगितले तर राज्यस्तरावरील प्रश्नाबाबत मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री ,शिक्षणमंत्री (Hingoli Education Department) यांच्याकडे पाठपुरावाकरून सोडविण्यात येतील, असे आश्वासन संघटना पदाधिकारी यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आमदार तान्हाजी मुटकुळे ,माजी आमदार रामराव वडकुते ,माजी आमदार गजानन घुगे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यासह संघटनेचे पदाधिकारी माधव वायचाळ , विकास फटांगळे , अंगद साबणे , इर्शाद पठाण , हरण्णा आप्पा बरगळ , शंकर सरनाईक आदि उपस्थित होते.