कळमनुरी (Kalmanuri Municipal Election) : कळमनुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दि.८ ऑक्टोंबर रोजी उपविभागीय कार्यालयात नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांचे वार्ड आरक्षित झाले तर काहींचे सोयीनुसार वार्ड सुटल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती दिसून आली.
कळमनुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक (Kalmanuri Municipal Election) २०२५ साठी दहा प्रभागाची रचना करण्यात आली असून या १० प्रभागांमधून वीस सदस्यांच्या आरक्षणासाठी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया घेण्यात आली यात सर्वप्रथम अनुसूचित जमाती सर्वसाधारण करिता प्रभात तीन मधील एक जागा व प्रभाग एक मधील एक जागा आरक्षित करण्यात आली अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी आरक्षित करण्यात आली.
त्यानंतर नागरिकांचा (Kalmanuri Municipal Election) मागास प्रवर्गासाठी पाच वार्डासाठी लहान मुलांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठ्या काढण्यात आल्या यानंतर महिलांसाठी ईश्वर चिठ्ठ्या काढण्यात आल्या यामध्ये प्रभाग क्रं १ (१-अ) अनुसूचित जमाती सर्वसाधारण, (१-ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं. २ (२-अ) सर्वसाधारण महिला, (२-ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ३ (३-अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, (३-ब) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रं. ४ (४-अ) सर्वसाधारण महिला, (४-ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रं. ५ (५-अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला, (५-ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रं. ६ (६-अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (६-ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं. ७ (७-अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (७-ब) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रं. ८ (८-अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला, (८-ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रं. ९ (९-अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला, (९-ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रं. १० (१०-अ) सर्वसाधारण महिला, (१०-ब) सर्वसाधारण या प्रमाणे आरक्षण सोडण्यात आले.
नगरसेवक पदाची आरक्षण (Kalmanuri Municipal Election) सोडत प्रक्रिया पार पडली.या वेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक,निकेत यरमळ,सुरज राजे,अमोल मोरे,महादेव शिंदे,अक्षय जगताप,मो.नदीम,मो.मगदूम,मनोज नकवाल, विशाल जारे, विनायक गाडेकर,सुदर्शन तावडे,अब्दुल अलीम यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.