बसपाने भरली भिवापूरात हुंकार
भिवापूर/मालेवाडा (Reservation Rescue Mission) : ज्यांनी 65 वर्षे या देशावर राज्य केले त्यांनी अनेकदा संविधानाशी छेडछाड केली . सत्तेसाठी संविधान बचावाच्या नावावर एस सी एसटी समाजाला गुमराह केले आता मात्र आरक्षण धोक्यात आल्यानंतर काँग्रेस गप्प का असा सवाल (Bhiwapur BSP) बसपाचे जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी भिवापूर येथे बसपाच्या महिला मिळाव्यात केला. स्थानिक जिचकार मंगल कार्यालयात आयोजित (Reservation Rescue Mission) आरक्षण बचाव अभियानांतर्गत महिला मेळाव्यामध्ये विद्याताई गायकवाड, उमरेड विधानसभा प्रभारी शशिकांत मेश्राम, दिलीप कांबळे, उमरेड विधानसभाचे अध्यक्ष पुनेश्वर मोटघरे नगरसेवक दुधीराम जनबंधू, आदी मान्यवर उपस्थित होते.

मनुस्मृति काळात शूद्रांना कोणतेच अधिकार नव्हते संविधानाने सर्व (Bhiwapur BSP) बहुजनांना न्याय दिला. त्यामुळे संविधान हा सर्वात मोठा धर्मग्रंथ असल्याचे प्रतिपादन विद्याताई गायकवाड यांनी केले. याशिवाय आरक्षण हे मीठ भाकरीचा प्रश्न नसून निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला वाटा मिळण्याचा मुद्दा आहे असे मत शशिकांत मेश्राम यांनी व्यक्त केले . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार संविधानात दिला मात्र तेच मत आता प्रस्थापित पक्ष अनेक प्रलोभने देऊन खरेदी करू पाहत आहेत त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे असे आवाहन नागपूर जिल्ह्याच्या प्रभारी रंजना ताई ढोरे यांनी केले. (Reservation Rescue Mission) कार्यक्रमाचे आयोजन भीमराव गजभिये यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्रीकृष्ण खोब्रागडे बोधिसत्व शेंडे बलवंत जांभुळकर पिंकी मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.




