एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले!
नांदेड (Revenue Employees Association) : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढल्याने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी (Revenue Officer) संघटना पुरग्रस्ताच्या मदतीसाठी सरसावली आहे.संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांना निवेदन देवून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister’s Relief Fund) जमा केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन!
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार मदतनिधीसाठी देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी पुढाकार घेतला आहे.२९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) संघटनेच्या वतीने निवेदन देवून महसूल कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करावे असे सांगितले आहे.
शेतकरी आणि कष्टकरी जनतेला मदत करणे हे आपले सामाजिक आणि नैतिक कर्तव्य!
लक्ष्मण नरमवार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यीतील शासकीय कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकरी आणि कष्टकरी जनतेला मदत करणे हे आपले सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. यामुळे, सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन एक दिवसाचा पगार नैसर्गिक आपत्ती निवारण निधी साठी द्यावा.नांदेड जिल्ह्यापासून याची सुरूवात करण्यात आली आहे.इतर जिल्ह्यांनी देखील तातडीने मदत जमा करावी,या मदतीमुळे पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना थोडाफार हातभार लागेल. या कठीण काळात सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी, असे आवाहन देखील लक्ष्मण नरमवार यांनी सर्वच विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना (Government Employees) केले आहे.यावेळी सोपान गुडाडे, शंकर मंगडेवार ,लक्ष्मण येमेवार, कराड मॅडम ,दराडे मॅडम,पपुलवार मॅडम, साहेबराव पेदेवाड,प्रकाश काबळे, येवते. शिरपुरकर .भुरे , गाजुलवार गज्जेवार. पोकले ,वैद्ये दराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.