माहिती देणार्या नागरीकांची ओळख ठेवणार गोपनीय
गडचिरोली (Pregnancy Diagnosis) : जिल्ह्यात गर्भलिंग निदानास प्रतिबंध असून कोणतीही व्यक्ती गर्भधारणेपूर्वी किंवा (Pregnancy Diagnosis) प्रसवपूर्व गर्भलिंग तपासणी करत असल्यास किंवा त्यास सहकार्य करत असल्यास त्याबाबत माहिती देणार्या व्यक्तीला प्रशासनाकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच, माहिती देणार्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे.
गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे, किंवा त्यासाठी मदत करणे हे सर्व गर्भधारणेपूर्व व (Pregnancy Diagnosis) प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा १९९४ व सुधारित कायदा २००३ नुसार गंभीर गुन्हे असून, दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी अथवा इतर व्यक्तीला १ लाख दंड व २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
बेकायदेशीर गर्भलिंग निदान (Pregnancy Diagnosis) करणार्या व्यक्ती, संस्था अथवा केंद्रांची माहिती नागरिकांनी पुढे आणावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक, अधिकारी किंवा कर्मचारी कोणीही असू शकतो. तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाइन : १८००२३३४४५४५ / १०४ आणि प्ूूज्://aस्म्प्ग्स्ल्त्aुग्स्aप्a.ग्ह या संकेतस्थळावर किंवा जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे संपर्क करावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी कळविले आहे.




