निर्णयामुळे लहान मुलांच्या शिक्षण व भविष्यावर परिणाम होऊ शकतो!
रिसोड (Risod Municipal Council) : रिसोड नगरपरिषदने (Risod Municipal Council) नगरपरिषद उर्दू शाळेमध्ये भाजीपाला व अन्य दुकाने लावण्याच निर्णय घेतला आहे. सदर निर्णयामुळे लहान मुलांच्या शिक्षण व भविष्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे सदर निर्णय रद्द करावा अशी मागणी दिनांक 23 जून रोजी स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिसोड नगर परिषदेने दिनांक 21 जून रोजी रिसोड शहरातील नगरपरिषद उर्दू शाळेमध्ये (Urdu School) प्रांगणात भाजीपाला तथा अन्य विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्याची आखणी केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्याचे वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी!
आंबेडकर चौक ते लोणी फाटा या दरम्यान, रस्त्यामध्ये असलेली दुकाने ही नगरपरिषद उर्दू शाळेच्या प्रांगणात भरवण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. सदर दुकाने जर लागली, तर लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न उद्भवतो. यामुळे लहान मुलांच्या भवितव्या साठी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी निवेदनात (Statement) करण्यात आली आहे निवेदन देताना इरफान कुरेशी, अकबर बागवान, शेख अकबर, फैय्याज अहमद, फतरू भाई, शेख अजीज, रियाज खान, तैवाज खान, मोहम्मद खालेद, जोरावर खान, खान शाहरुख आधी उपस्थित होते. यावर मुख्याधिकारी यांना विचारले असता ते म्हणाले की, शहरातील मुख्य रस्त्याचे वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची (Citizens) मागणी आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वरदळीचा रस्ता असल्याने क्षेडखानीचे प्रकार वाढत आहे आणि फळ आणि भाजी विक्रेत्याची प्रस्तावित जागा सुद्धा नगरपालिकेच्या मालकीची आहे. विद्यार्थ्याच्या शिक्षणावर (Student Education) याचा कोणताही परिणाम होणार नाही, तसेच उर्दू शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता लक्षात घेता इतरत्र जागेची निवड सुरू आहे. नागरिकाच्या मागणीवरून हा निर्णय घेतला असून, जनतेने याला बळी पडू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले




