Risod : रिसोड तालुक्यातील पाचंबा येथील स्व. धनंजय जनार्दन गव्हाणे यांनी नापिकी आणि शेतीवर असणारे कर्ज याला कंटाळून आत्महत्या (suicide) केली. ते अत्यल्प भूधारक शेतकरी होते. त्यांच्या परिवारात 85 वर्षाचे वयोवृद्ध वडील, पत्नी, तीन मुली त्यातील एक विधवा मुलगी, एक मुलगा एवढा परिवार सोडून स्वर्गीय धनंजय यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
या आत्महत्या ग्रस्त कुटुंबास विष्णुपंत भुतेकर यांनी नुकतीच भूमिपुत्र च्या पदाधिकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार असून रिसोड कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीकडून रिसोड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देणार असल्याचे सांगितले. त्यांची सोबत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य संघटन डॉक्टर जितेंद्र गवळी, रवींद्र चोपडे, संतोष गव्हाणे, अजय गव्हाणे, सुनील जाधव हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.