Samudrapur :- यावर्षी अतिवृष्टी (heavy rain) व सोयाबीन (Soyabean)पिकावर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. उमरी येथील शेतकर्याने सोयाबीनमधून उत्पन्न होण्याची आशा मावळल्याने चक्क आठ एकरातील सोयबीन पिकाला चक्क स्वत:च्या डोळ्यासमोर आपल्या हाताने आगीच्या स्वाधीन केले.
उमरी येथे अतिवृष्टी व विविध रोगाने ग्रासलेल्या सोयाबीनला लावली आग
उमरी येथील शेतकरी रुमदेव ठेंगणे यांनी आठ एकर शेतजमीनवर सोयबीनची पेरणी केली. पिकाला खते दिले. सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच किटकनाशकांची फवारणीसुध्दा केली. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक पिवळे पडले. त्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने हा रोग जाईल आणि सोयाबीनच्या शेंगा भरतील, अशी आशा बाळगून होते. मात्र शेंगा अर्धवट भरल्यामुळे शेतकर्याने सोयाबीनची कापणी तर केली, मात्र मळणीचा खर्च निघणार नाही या भितीने शेतकरी रुमदेव ठेंगणे यांनी तळहाताच्या फोडासारखे जपलेल्या ८ एकरातील सोयाबीन पिकाला स्वत:च्या डोळ्यासमोर आगीच्या (Fire)स्वाधीन केले. यामध्ये शेतकर्याचे ४ लाख रुपयांच्या वर नुकसान झाले आहे. यावरून शेतकर्यांची परिस्थिती अतिशय विदारक असल्याचे दिसून येते