हे प्रकरण निवडणुकीशी संबंधित?
मुंबई (Tahawwur Rana) : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला 10 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. ठोस पुराव्यांच्या आधारे, 2008 मध्ये मुंबईत निष्पाप लोकांची हत्या करणारा गुन्हेगार तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला भारतात आणण्यात यश आले आहे. तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर, त्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे. दहशतवादी तेहव्वुर राणाला (Tahawwur Rana) कधी फाशी दिली जाईल? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे यूबीटीचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तहव्वुर राणा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
VIDEO | Mumbai: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut (@rautsanjay61) says, "A terrorist who has direct relations with Pakistan and played a major role in Mumbai terror attacks… if such a person is brought from Pakistan, then we should welcome the Government of India, agencies.… pic.twitter.com/qq6CYTzuih
— Press Trust of India (@PTI_News) April 11, 2025
शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे. पण त्यासोबतच त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला बिहार निवडणुकीपूर्वी फाशी दिली जाणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. बिहार निवडणुकीनंतर तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) फाशी दिली जाईल. लक्षात ठेवा, बिहारमध्ये विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये होऊ शकतात.
संजय राऊत यांनीही केला काँग्रेसचा उल्लेख
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, तहव्वुर राणा यांना भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न गेल्या 16 वर्षांपासून सुरू आहेत, जे काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाले होते. “तहव्वुर राणा (Tahawwur Rana) यांना भारतात परत आणण्यासाठीचा लढा गेल्या 16 वर्षांपासून सुरू आहे आणि तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला होता. त्यामुळे राणा यांना परत आणण्याचे श्रेय कोणीही घेऊ नये.”
कोण आहे तेहव्वुर राणा?
तेहव्वुर राणा (Tahawwur Rana) हे 64 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला पण त्यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. तहव्वुर राणा हा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा प्रमुख सहकारी आहे. हेडलीकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. अथक प्रयत्नांनंतर, तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून भारतात यशस्वीरित्या प्रत्यार्पण करण्यात आले आहे. कारण यापूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाला भारताकडे सोपवण्याचा अर्ज फेटाळला होता. परंतु पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेने राणाला प्रत्यार्पण करण्यास सहमती दर्शविली. हे मोदी सरकारचे मोठे राजनैतिक यश आहे.