भरदिवसा घडला प्रकार ;वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टाळला..!
परभणी/सेलू () : शहरातील लोकमंगल नगर मध्ये राहत असलेल्या अकोली तालुका परतुर येथील महिला सरपंच (Sarpanch Attack Case) यांचे पती ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके वय ४२ वर्षे आपल्या कार क्रमांक एमएच ३७ व्ही ५७६७ ने सेलूहुन बुधवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जात असताना तीन दुचाकी वरून आलेल्यांनी त्यांच्यावर सेलू -हादगाव पावडे रस्त्यावर असलेल्या खदानीच्या पुलाजवळ अचानक हल्ला केला.
ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर करण्यात आलेल्या या जीवघेणा हल्ल्यात रस्त्यावरील वर्दळमुळे त्यांचे प्राण वाचले अशी माहिती घटनास्थळी असलेल्या जमावातील उपस्थितांनी दिली आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे परतुर तालुक्यातील अकोली च्या सरपंच यांचे पती तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे समर्थक ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके आपल्या कार क्रमांक एम एच ३७ वी ५७६७ ने आष्टी येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणाऱ्या बंधार्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला जात असताना बुधवार २ एप्रिल रोजी सेलूहून निघाल्यानंतर हादगाव पावडे परिसरात असलेल्या एका खदानीच्या पुलाजवळ आले असता त्यांच्यावर (Sarpanch Attack Case) अचानक हल्ला करण्यात आला.
यामध्ये त्यांच्या पायास जबर मार लागल्याने ज्ञानेश्वर सोळंके यांचा पाय फ्रॅक्चर झाला. (Sarpanch Attack Case) घटनास्थळीचा हा रस्ता वरदळीचा आणि दिवसा १० ते ११ दरम्यान ही घटना घडल्याने ज्ञानेश्वर सोळंके यांच्या मदतीला अनेकजण धावून आले. तेव्हा हल्लेखोर आपल्या तीन दुचाकी वरून फरार झाले. या घटनेची माहिती कळल्यानंतर जखमी ज्ञानेश्वर सोळंके यांना सेलू जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने पुढील उपचारार्थ परभणीतील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती प्रसारमाध्यमावर आल्यानंतर सर्वत्र चर्चेला उदान आले. ही (Sarpanch Attack Case) घटना परतुर परिसरात बंद पडलेल्या क्रेशर मुळे झाल्याचे पुढे आले असले तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर खरे कारण आणि मारहाण करणारे उघड होतील. या जीवघेणा हल्ल्याचा वृत्तांत पाठवेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते. दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली असून या परिसरात सीसीटीव्ही फुटेची मदत होईल का याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान सरपंच पती ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर झालेल्या (Sarpanch Attack Case) प्राणघातक हल्ल्यात केवळ मदतीला अनेक जण धावून आले म्हणूनच पुढील अनर्थ टळला.