तालुक्यातील सरपंच असुरक्षित!
पुसद (Sarpanch Case) : मागील काही दिवसात तालुक्यातील सरपंच (Sarpanch) व त्यांच्या परिवारावर गावातील नागरिकांकडून हात उगारणे मारहाण करण्याच्या घटना पुढे येत असून, आता अश्या विषयावर तक्रार करण्यास गेलेल्या, सरपंचाला ठाणेदाराकडून देखील असभ्य वागणूक (Rude Behavior) मिळाल्याने सरपंच वर्गात असुरक्षित तेची भावना निर्माण झाली आहे.
कुठलीही चौकशी न करता ठाणेदारांनी अपमानास्पद वागणूक!
मागील आठवड्यात आसोली येथील महिला सरपंच पुष्पा सुभाष कोल्हे व त्यांचा मुलगा ग्रा. पं. सदस्य यशवंत कोल्हे यांना सभा सुरु असतांना गावातील सुधाकर गायकवाड या इसमाने लोखंडी रॉड ने मारहाण केली. या घटनेच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच घाटोडी येथील सरपंच गणेश भुजाडे यांनी गावामध्ये वाद होऊ नये या उद्देशाने अतिक्रमण हटवण्या ठिकाणी गेले. तिथे वाद घालणार्या एका इसमाने सरपंचाला शिवीगाळ करून हात उगारला. वाद घालणरा व्यक्ती कोणाचेही ऐकत नसल्याने ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद (Rural Police Station Pusad) येथे तक्रार देण्यासाठी गेले. त्या ठिकाणी ठाणेदारांनी सरपंचाला गुन्हेगारासारखी वागणूक देत सरपंचांना तू त्या ठिकाणी कसा काय गेला? तू काय कलेक्टर आहेस का? अशा शब्दात बोलून बाहेर जा असे सांगितले. कुठलीही चौकशी न करता ठाणेदारांनी (Thanedar) अपमानास्पद वागणूक दिल्याचे वृत्त पसरताच येथील सरपंच संघटनेतर्फे ठाणेदारावर कार्यवाही करावी अन्यथो तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अश्या ईशार्याचे निवेदन पुसद तालुका सरपंच संघटना तर्फेअध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष गजानन तारफे, सचिव चंद्रकांत हराळ व तालुक्यातील असंख्य सरपंच याच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) यांना देण्यात आले