खांडेगाव, टेंभुर्णी,हयात नगर सर्कलमधील शेतकऱ्यांचा सहभाग
वसमत/ हयात नगर (Farmer loan waiver) : वसमत तालुक्यात ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी होऊन शेतक-यांचे सर्व पिके पाण्यात गेली आहेत. ब-याच शेती खरडुन गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी (Farmer loan waiver) कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शनिवारी हयातनगर पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये टेंभुर्णी खांडेगाव हयात नगर सर्कलमधील शेतकरी सहभागी झाले होते.रास्ता रोको मुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
वसमत तालुक्यातील हयातनगर पाटी येथे 4 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. टेंभुर्णी हयात नगर खांडेगाव परिसरातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या आंदोलनाचा ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या पाल्याचे परीक्षा शुल्क माफ करावे, आधी मागण्या मानण्यात आल्या. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी परिसरातील शेतकरी कार्यकर्ते नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.
हयातनगर खांडेगाव टेंभुर्णी सर्कल मधील शेतकऱ्यांसह तालुकाभरातील शेतकऱ्यांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आजच्या या (Farmer loan waiver) आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.