कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ करणार विदर्भाचे नेतृत्व
अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा
नांदगाव पेठ (National Kabaddi Tournament) : चंदीगड येथे २५ ते २८ जुलै २०२५ दरम्यान आयोजित ७२ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्यातील दोन खेळाडूंची विदर्भ संघात निवड झाली आहे. ही निवड अमरावती जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. अॕम्यूचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या संलग्नित असलेल्या (National Kabaddi Tournament) कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी अनमोल गजभिये व संजना गायगवई यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. हे दोघेही सप्तरंग क्रीडा मंडळ नांदगाव पेठ येथील खेळाडू असून यांच्या निवडीमुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेलेला आहे.
महानगर कबड्डी असोसिएशन (National Kabaddi Tournament) अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ६ जुलै दरम्यान विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये दर्जेदार सामने खेळणाऱ्या खेळाडूंची कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड केली. यामध्ये सावर्डी येथील अनमोल गजभिये आणि नांदगाव पेठ येथील संजना गायगवई या दोन्ही खेळाडूंचा समावेश आहे. सप्तरंग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू विविध राज्यस्तरीय सामन्यात खेळलेले असून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची ही महत्वपूर्ण संधी त्यांना मिळालेली आहे.
अनमोल गजभिये, संजना गायगवई यांच्या निवडीमुळे कबड्डी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले असून चंदिगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. (National Kabaddi Tournament) कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर ची टीम मंगळवारी चंदीगड साठी रवाना झाली असून, त्यांना अमरावती महानगर कबड्डी संघ असोसिएशनचे अध्यक्ष विवेक गुल्हाने, कार्याध्यक्ष संदीप इंगोले व उपाध्यक्ष अतुल इंगोले, योगेश भोसले, कोषाध्यक्ष मिलिंद पाटील सचिव नितीन सराफ तसेच गणेश वरुडकर राजेश गाडे, अजय पुसतकर धनराज यादव,सप्तरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुळे निलेश सराफ, संतोष चिखलकर आदींनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.