शेतकरी नेते डॉॅ. रमेश शिंदे यांचे आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन नमले
हिंगोली (Sengaon Andolan) : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी-आजेगाव या पांदन रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासुन रखडले होते. व सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हाळशी गावा शेजारी पुलाचे बांधकाम केल्याने त्या गावातील शेतकर्यांना शेतामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ताच बंद झाल्याने म्हाळशी येथील स्त्री, पुरूष व गुराढोरासह २७ ऑगस्टपासुन शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांंच्या नेतृत्वात उपोषण व गुराढोरांची ठिय्या आंदोलन केले होते. तिसर्या दिवशी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंंता सुदेश देशमुख यांनी आज २९ ऑगस्ट रोजी उपोषण कर्त्यांना पत्र व्यवहार करून आठ दिवसात म्हाळशी-आजेगव पांदन जोडरस्ता करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्त आंदोलन स्थगीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
उपोषण व गुराढोरांचे आंदोलन तुर्त स्थगीत
राज्यमार्ग हिंगोली- आजेगाव-रिसोड रोड वरील म्हाळशी गावालगत १० फुट उंचीचा पुल संबंधित विभागाने फरशी टाकुन बांधला होता. त्या ठिकाणी १० फुट पुल झाल्यामुळे म्हाळशी- आजेगाव पांदन रस्ता पुर्णपणे बंद झाल्याने शेतकर्यांना शेतामध्ये पेरणी,वखरणी, औषध फवारणी यासह शेतीतील कामे करता आली नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे म्हाळशी-आजेगाव पांदन रस्ता तयार करून देण्यासाठी अनेक वेळा शेतकर्यासह शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांनी निवेदन दिले होते. परंतु यांची दखल न घेतल्याने २७ ऑगस्ट रोजी हिंगोली येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर (Sengaon Andolan) आमरण उपोषण व गुराढोरांचे ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली होती.
या आमरण उपोषणातील काही जणांची प्रकृती ही खालावत चालल्याने प्रशासन खडबडुन जागे झाले. २८ ऑगस्ट रोजी शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे पाटील व )Sengaon Andolan_ उपोषण कर्त्यांची भेट घेण्यासाठी उपविभागीय अभियंता सुदेश देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपोषण सोडण्यासाठी मनधरणी करत होते. परंतु उपोषण कर्त्यांनी व डॉॅ. रमेश शिंदे यांनी आक्रमक भुमिका घेत जोपर्यंत रस्त्याच्या बांधकामाला सुरूवात केली जाणार नाही असा पवित्रा घेवुन त्या ठिकाणाची अन्न शिजवुुन जेवणाचा आस्वाद ही उपोषण कर्त्यांसह अधिकार्यांनी घेतला होता.आज २९ ऑॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी सुदेश देशमुख यांच्यासह अन्य अधिकार्यांनी उपोषण कर्त्यां शेतकर्यांची परत भेट घेवुन उपोषण व ठिय्या आंदोलन परत घ्यावे यासाठी गळ घातली.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी उपोषणकर्ते व डॉॅ. रमेश शिंदे यांना लेखी पत्र देत म्हाळशी-आजेगाव रस्त्यावरील अस्त्विात असलेला पुल फार वर्षापासुन तो कालबाह्य झाल्याने तो नव्याने बांधकाम करून घेण्यासाठी आवश्यक होते. तसेच त्यामुळे येत्या आठ दिवसात म्हाळशी-आजेगाव रस्त्यावरील पांदन जोडरस्त्याचे काम पुर्ण करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्याने उपोषणकर्ते (Sengaon Andolan) व शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांना लिंबु शरबत पाजुन उपोषण तुर्त सोडले आहे. यावेळी डॉ. रमेश शिंदे यांच्यासह रामेश्वर बरडे, पांडुरंग बरडे, शंकर पाढरे, आश्रु बरडे, गजानन गायकवाड, शिवाजी बरडे यांच्यासह मुले, महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.