पार्किंगची जागा नसताना सुद्धा ट्रक राहतात रस्त्यावर, ट्रक ठेवून ट्रक ड्रायव्हर पसार
आष्टी (Ashti-Chamorshi road) : आष्टी -चामोर्शी -गडचिरोली महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जबर धडक दिल्यामुळे दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. संजय निमरड (३०) ,नागोराम बोमकंट्टीवार दोन्ही रा. अनखोडा ता. चामोर्शी अशी जखमींची नावे आहेत.
ट्रक क्रमांक श्प् ४० ण्श् २८५७ हा पार्कींगची जागा नसतांनाही रस्त्यावर उभा होता. यामुळे (Ashti-Chamorshi road) दुचाकी चालकाचे लक्ष विचलीत होऊन दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेची माहिती आष्टी पोलीस ठाण्याला मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व पोलीस निरीक्षक विशाल काळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.
लोहखनीज वाहतुक करणारे ट्रक ड्रायव्हर राजरोसपणे इकडे- तिकडे फिरत असतात. या (Ashti-Chamorshi road) ट्रक चालकावर कोणाचेही नियंत्रण नाही . ट्रक चालक आपल्या मनमानीने गाडी चालवत असतात आणि कुणालाही जुमानत नाही. गाडी ठेवून कुठेही चालले जातात. याामुळे अशा उभ्या असलेल्या अनेक प्रकारमुळे आजपर्यंत कित्येक जणांचे जीव गेलेले आहेत. यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.