अखेर महामार्गासाठी जमीन मोजणी बारगळली!
लातूर (Shaktipeeth Highway) : चंद्रपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमीन मोजणीस लातूर जिल्ह्यात मंगळवारी शेतकऱ्यांनी (Farmers) प्रचंड विरोध केल्याने अखेर महामार्गासाठी जमीन मोजणी बारगळली. शेतकऱ्यांचा विरोध पाहून पोलीस व प्रशासन माघारी फिरले. लातूर तालुक्यातील ढोकी (येळी) येथे ही जमीन मोजणी (Land Survey) होणार होती.
भूसंपादनाचे काम करण्यासाठी प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या!
शक्तीपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) लातूर जिल्ह्यात भूसंपादनाचे काम (Land Acquisition Work) करण्यासाठी प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच मंगळवार पासून या महामार्गासाठी जमीन मोजणीचा कार्यक्रमही जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार, प्रशासनाने (Administration) चोख पोलीस (Chokh Police) बंदोबस्तासह मंगळवारी लातूर तालुक्यातील ढोकी (येळी) गावात दाखल होत मोजणीसाठी हालचाली चालविल्या. मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या जमीन मोजणीला तीव्र विरोध दर्शविला. ‘शेती वाचवा देश वाचवा’, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान केलेले शेतकरी या आंदोलनात ‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा!’, अशी घोषणाबाजी करीत आक्रमक झाले. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून प्रशासनाने जमीन मोजणीचा आपला कार्यक्रम अखेर रद्द केला.




