Hingoli :- आज दि.27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस(Nationalist Congress) शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या काळ्या कारनाम्याच्या विरोधात निषेध म्हणून काळे फुगे उडवून, दहीहंडी फोडून काळ्या कारनाम्याची पत्रके वाटून तसेच महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन हे आंदोलन करण्यात आले.
महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन आंदोलन
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अनिलराव पतंगे, माधवराव कोरडे, मनिष आखरे, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, निहाल भैय्या, बंडूजी मुटकुळे, प्रा.गुलाब भोयर,उमेश देशमुख,शिवाजी शिंदे, संतोषराव गुट्टे, संचित गुंडेवार, रवि गडदे,,गणेशराव गडदे, भास्करराव कुरे,ऍड अमित कळासरे, कमलेश यादव, प्रफुल सोनूने, अजीम प्यारेवाले, ईश्वर उरेवार, विशाल खंदारे, संतोष साबळे, केदार डांगे,यशवंता खंदारे, सौरभ चव्हाण,धीरज काकडे,रजत देशमुख, आकाश देशमुख, विनायक माखने यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.