सरांडी/बु. येथील शिवाजी चौक ते हेटी रस्त्यांचे दुरुस्ती करीता आमरण उपोषण
लाखांदूर (Shiv Sena Andolan) : तालुक्यातील सरांडी/बु. येथील शिवाजी चौक ते हेटी रस्त्याचे दुरावस्थाकडे शासन- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सदर रस्त्याच्या असलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे, या करीता या रस्त्यांने ये-जा करणार्या ७ शालेय विद्यार्थी, हेटी येथील वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील सदस्य, शेतकरी, शेतमजुर यांचेसह (Shiv Sena Andolan) शिवसेना (उबाठा)तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दि.२८ ऑगस्ट रोजी दुपारी १.०० वाजता दरम्यान आमरण उपोषणाला शिवाजी चौक येथे बसून सुरुवात केली आहे.
सरांडी/बु. येथील शिवाजी चौक ते हेटी व त्यापुढे जुना ढोलसर, विरली रस्ता मागील ७० वर्षाचे, तीन पिढ्यांचे काळापासून गावापासून १ किलो मिटर अंतराचे आत ढोरे कुटुंब वास्तवास असून शासन-प्रशासनाचे सदर रस्त्यांचे दुरावस्थेकडे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याला मागील दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याला दोन ते तीन फुट पाणी साचलेले असून त्यात साचलेल्या पाण्यातून शाळकरी मुलांना, कुटुंबीयांना व त्या रस्त्यांने ये-जा करणार्या शेतकरी-शेतमजुरांना त्या साचलेल्या पाण्यातून तारेवरची कसरत नव्हे तर सर्वांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या रस्ता दुरुस्ती वा नवीन बांधकामासबंधी संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने व शाब्दीक वा प्रसारमाध्यमाचे साहाय्याने माहीती देवूनही अजून पर्यंत ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येथील रहदारी करणारे शालेय विद्यार्थी, कुटुंब सदस्य, शेतकरी, शेतमजुर यांचे नेतृत्व करीत सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना (उबाठा गट) लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी जो पर्यंत सदर समस्येचे निराकरण होत नाही, तो पर्यंत (Shiv Sena Andolan) आमरण उपोषण करणार, असा ईशारा शासन- प्रशासनाला देत दि. २८ ऑगस्टला आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यावेळी त्यांचेसोबत ७ शाळकरी मुले, नितीन ढोरे, केशव ढोरे, रूपेश चांदेवार, मुन्ना बुराडे, शिवाजी ढोरे, हरीदास तुपटे, सुदाम तुपटे, धनराज तुपटे यांचे सह अन्य पिडीत ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर रस्त्याने शालेय मुलांना, कुटुंबीयांना, शेतकरी, शेतमजुरांना नियमित कमर-कमरभर पाण्यातून जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे दुरावस्थेसबंधी सबंधित विभाग व शासन- प्रशासनाला माहीती देवूनही योग्य व ठोस कार्यवाही व समस्यांचे निराकरण होत नसल्याने जो पर्यंत समस्या सुटणार नाही, तो पर्यंत आमरण उपोषण मरेपर्यंत सुरु ठेवु.
-विनोद ढोरे, शिवसेना (उबाठा)तालुका प्रमुख