स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मोठी जबाबदारी !
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : शिवसेना शिंदे गटाचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची पक्षाच्या बुलढाणा जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीचे पत्र शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याहस्ते तथा शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना देण्यात आले. मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात आज मंगळवार ३ जून रोजी सदर नियुक्ती झाल्याने, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या खांद्यावर ही मोठी संघटनात्मक जबाबदारी येऊन पडली आहे.
यापूर्वीच्या जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या पक्षाने रद्द केल्या आहेत. जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचे संघटन पाहता त्यांच्यावर ही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांना आता या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. जिल्हा संघटक पदाच्या अधिनस्त पक्षातील संपूर्ण अंगिकृत संघटना या माध्यमातून काम करतील, असे निर्देश उपमुखमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. नियुक्तीपत्र देताना ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) , महिला संघटक ज्योती वाघमारे हजर होते. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) महिला आघाडीमध्ये बुलढाण्यातील काही राजकीय महिलांनी प्रवेश केल्याचेही वृत्त आहे.