कळमनुरी विधानसभेचे उमेदवार डॉ. संतोष टारफे व हिंगोली विधानसभेचे उमेदवार रुपालीताई पाटील गोरेगावकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ
कळमनुरी/हिंगोली (Shiv Sena Uddhav Thackeray) : कळमनुरी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे व हिंगोली विधानसभेचे उमेदवार रुपालीताई पाटील गोरेगावकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा दिनांक 9 रोजी दुपारी एक वाजता कळमनुरी येथील लमानदेव मंदिर परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला प्रमुख उपस्थिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेना नेते बबनराव थोरात संपर्कप्रमुख नांदेड हिंगोली जिल्हा, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू सावंत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण ,व महाविकास आघाडी हिंगोली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




 
			 
		

