केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दुबईतील अबुधाबी येथे 23 फेब्रुवारीला साजरा झाला शिवजयंती उत्सवात
बुलढाणा (Prataprao Jadhav) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक असल्याच प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी अबुधाबी येथे केले.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 फेब्रुवारीला बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव (Shiv Jayanti) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) हे होते तर अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती , खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात बोलताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली असून आजच्या ही पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये लोकांच्या हिताची कामे केलीत.
अशा स्वरूपाची कामे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं सातासमुद्र पार ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shivaji Jayanti) उत्सव साजरा केला जातो हे मराठी माणसासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुद्धा येणार होते त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे त्यांनी मला या कार्यक्रमाला जावं, अस आवर्जून सांगितल्याचे ही प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) म्हणाले. अबुधाबी येथील मराठी माणसांसोबत त्यांनी संवाद साधला या कार्यक्रमाला अबुधाबी येथील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुबई येथे महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
आखाती देशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येऊन सामाजिक कार्यक्रम साजरी करता यावे. यासाठी दुबईत महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र स्तरातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी अबुधाबी येथे नागरिकांशी संवाद साधताना दिली. यावेळी उपस्थित त्यांनी जय भवानी जय शिवराय चा (Shivaji Jayanti) जयघोष करून घोषणेच स्वागत केलंय.