अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जीवनावश्यक वस्तू वितरित!
नांदेड (Shivnishchal Trust) : जिल्ह्यातील मुखेड व नायगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसान झालेल्या भागात जीवनावश्यक वस्तू वितरित करून शिवनिश्चलनच्या मदत कार्याला सूर्यात सुरुवात झाल्याची माहिती शिवव्याख्याते शिवनिश्चलन सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी यांनी दिली.
आर्थिक स्वरूपात मदत!
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना समाजासाठी (Society) मदतीतून योगदान देत शिवविचार प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त व्हायला हवेत या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम आज नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त व ज्या कुटुंबावर नियतीने घाला घातला आहे अशा काही आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी थेट जात त्यांना जीवनावश्यक वस्तू या कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य तसेच सरसकट आर्थिक स्वरूपात मदत वितरित केली आहे.
तेल, पोहे, तांदूळ, बिस्कीटपुडे, चहा, साखर, साबण, टूथपेस्ट अशा बाबीचाही यात समावेश आहे दिवाळीच्या दिवसात अशा घरामध्ये मदतीचा दिवा लावला तरच त्याची उमेद कायम राहील व या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारले असे यावेळी त्यांनी सांगितले या मदत कार्याच्या टीम मध्ये सौ.पूनमताई गोसावी, गजानन पाटील होटाळकर, बालाजी पाटील ढोसणे, माधव पाटील खदगावे, बालाजी पा.सांगवीकर, रमाकांत पा.हिवराळे, तुकाराम सुडके, गिरीधर पा.शिंदे, प्रदीप पा.इंगोले, दिनेश केरुरकर, प्रितेश बच्छाव, विवेक सोनवणे, रुद्र गोसावी आधीच्या समावेश आहे.
आधार देण्याचा आमचा प्रयत्न!
“शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त आहेत आणि त्यातही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांना आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच दिवाळी निमित्ताने आर्थिक मदत, फराळ व जीवनावश्यक वस्तू वितरित करीत आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यातच शिवनिश्चल ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे समाधान आहे.
– सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी अध्यक्ष शिवनिश्चलन ट्रस्ट