वरठी पोलिसांची तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ
कोथुर्णा येथील धक्कादायक घटना
कोथुर्णा येथील धक्कादायक घटना
भंडारा () : गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर शेणपुंजा फेकण्यास गेलेल्या तरुणीला गावातीलच एका मद्यपी तरुणाने मारहाण करुन गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करुन धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे दि.१२ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान घडली. पूनम मन्नू कांबळे (२०), असे जखमी तरुणीचे नाव असून दिनेश शिवशंकर बोंद्रे (३५) रा.कोथुर्णा, असे मारहाण करणार्या तरुणाचे नाव आहे. सदर (Woman beaten Case) प्रकरणाची तक्रार नोंद करण्यास वरठी पोलीस टाळाटाळ करीत आहेत. यामुळे वरठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सर्वसामान्य नागरिकांत पोलिसांप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोथुर्णा येथील मन्नू कांबळे हे दिव्यांग असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरीता शेळी पालन करीत आहेत. दि.१२ मे रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान शेळ्यांचा शेणपुंजा घेऊन पूनम ही गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर गेली होती. त्यादरम्यान दिनेश बोंद्रे या मद्यपीने तिला, ‘येथे खात कशाला फेकतेस’, या क्षुल्लक कारणावरुन तिला अश्लिल शब्दात शिविगाळ करुन काठीने मारहाण केली. दिनेश यावरच थांबला नाही तर काठीने मारहाण करीत खातकुड्यावरुन गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करीत एक प्रकारे गावातून धिंड काढली.
मुलगी मारहाणीत, ‘वाचवा-वाचवा’, अशी ओरडत असतांना घरी असलेली आई व बहिणी पूनम हिला वाचविण्यासाठी घरासमोरील रस्त्यावर आल्या. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दिनेश तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने भांडणात आलेल्या आई व बहिणीला मारहाण केली. तसेच मानव जातीला काळीमा फासणार्या अश्लिल शब्दात शिविगाळ करुन समाजात महिलांची नामुष्की केली. या (Woman beaten Case) प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांत चीड निर्माण होत आहे.
घडलेला प्रकरण मुलीने भ्रमणध्वनीवरुन वरठी पोलिसांना देण्यात आली. मात्र वरठी पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाकडे कानाडोळा करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूनम कांबळे या तरुणीच्या कुटुंबियांना वरठी पोलिसांकडून रुग्णवाहिकेसोबत पोलीस कर्मचारी येणार असल्याची माहिती दिली. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन थातूरमातूर पाहणी केली. (Woman beaten Case) जखमीला उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. मात्र पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून केवळ टाळाटाळ करीत आहेत.
तक्रार दाखल करुन मारहाण करणार्या तसेच महिलांची बेअब्रू करणार्या तरुणाविरुद्ध कारवाई करण्यास वरठी पोलीस मागे-पुढे पाहत आहे. हे एक न समजणारे कोढेच म्हणावे लागेल. यावरुन या प्रकरणात पाणी कुठे मुरत आहे, अशा शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. परिणामी वरठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून मानव समाजाला काळीमा फासणार्या (Woman beaten Case) प्रकरणातील दोषीची वरठी पोलीस पाठराखण करत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून सर्वसामान्य नागरिकांत पोलिसांविरोधात तीव्र संतापजन्य भावना व्यक्त होत आहेत.
वरठी पोलिसांकडून गुन्हेगाराची पाठराखण
जखमी तरुणी उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात जाऊन जखमीच्या आईशी संवाद साधून प्रकरणाची माहिती जाणून घेतली. वरठी पोलीस गुन्हेगाराची पाठराखण करीत असून त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. हे सर्व करण्यासाठी गुन्हेगाराकडून अर्थव्यवहार केल्याचा आरोप जखमीच्या आईने केला आहे. (Woman beaten Case) गुन्हेगाराकडून या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जोपर्यंत आमच्या कुटुंबाला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नाही, गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत नाही, तोपर्यंत आमचा लढा कायम राहील, असे जखमीची आई शेवंता मन्नू कांबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.