हट्टा (Bachchu Kadu Protest) : बच्चुभाऊ कडू हे शेतकर्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आंदोलनास मुख्यमंत्र्यांचा एकही प्रतिनिधी आंदोलन स्थळी आला नसल्यामुळे वसमत तालुक्यातील हट्टा येथील ग्रामपंचायत सदस्य पुष्पकराव देशमुख हे बीएसएनएलच्या टावर वर कडून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री (Bachchu Kadu Protest) बच्चू कडू हे शेतकर्याच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन करीत आहेत.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारमधील कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलनाला भेट दिली. नसल्याच्या निषेधार्थ १२ जून रोजी आता येथील ग्रामपंचायत सदस्य पुष्पकराव देशमुख यांनी एसएनएलच्या टावर वर शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी येणार नाहीत तोपर्यंत ते खाली उतरणार नसल्याचा पवित्रा देशमुख यांनी घेतला होता. तहसिलदार शारदा दळवी यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले. यावेळी सपोनि संग्राम जाधव, ताम्रध्वज कासले, सांगळे, सरपंच दिपक हतागळे, किरण देशमुख, गोविंद देशमुख, सतिष देशमुख, विशाल पवार, शुभम कदम उपस्थित होते.