Udaypur files Ban :- उदयपुर फाईल्स या हिंदी चित्रपटावर बंदी (Ban)घालावी, चित्रपटाचे (Movie)प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी सकल मुस्लीम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे.
सकल मुस्लीम समाजाचे शासनाला निवेदन
उदयपुर फाईल्स (Udaypur Files)या चित्रपटामध्ये इस्लामिक धार्मिक भावना भडकावण्याचा आणि त्यांचा अपमान करण्याचा आणि मुस्लीम समुदायाविरुध्द खोटा प्रचार करण्याचे दृश्य आहे. या चित्रपटात वादग्रस्त व्यक्तीरेखा नुपूर शर्माचे दृश्य आहे. धार्मिक सलोखा आणि शांततेला हानी पोहोचवणार्या नुपूर शर्माच्या विधानाविरुध्द देशभरात गुन्हे दाखल झाले आहेत. चित्रपटातील दृश्यांमुळे मुस्लीम धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शेख मोहसीन, नितीन सावंत, जावेद अन्सारी, तस्लीमोद्दिन खतीब, अब्दुल सोहेल, शेख इरफान, अरबाज शेख, अतुल बलांडे, अदनान, युनूस, सोहेल चाउस, अफजल खान, जावेद, सय्यद अब्दुल खादर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.