भक्तिमय वातावरणात पानकनेरगाव नगरी दुमदुमली!
पानकनेरगांव (Shri Sant Gajanan Maharaj Palkhi) : विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखीने पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज 2 जून रोजी सकाळी प्रस्थान केले. श्रींच्या पालखीचे हे 56 वे वर्ष आहे. पालखी सोबत 700 वारकरी असून जवळपास एकूण 725 कि मीचा रस्ता विठ्ठलाच्या जयघोषामध्ये 1 महिन्यात पूर्ण करणार आहेत.
श्री संत गजानन महाराज पालखीचे 56 वे वर्ष वारकऱ्यांनी पांढरे वस्त्र परिधान करून हातात भगवे पताके!
संपुर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या (Saints’ Palanquins) दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगावचं गजानन महाराज संस्थानाकडून 1968 पासून पंढरपूरला पायी वारी केली जाते. तीच परंपरा जोपासत श्री छेत्र शेगाव येथून 700 वारकऱ्यासह (Warkari) टाळमृदंगाच्या गजरात विठ्ठलाचा नाम जयघोष करत भगवे पताके हातात घेऊन 2 जून रोजी पंढरपूर कडे निघालेली होती.
जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव!
श्री संत गजानन महाराज यांची पायदळ पालखी विदर्भातून 10 दिवसाच्या प्रवासानंतर 12 जून रोजी सकाळी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे पाटील हे स्वागताला उपस्थिती लावतात. यावेळी त्यांचे पुत्र शिवाजी मुटकुळे यांनी व तसेच मराठवाड्यातील भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे फटाके लावून जल्लोषात स्वागत केले व तसेच मराठवाडा -विदर्भ अंतरावर काही अंतरावर असलेल्या पानकनेरगाव येथे मुख्य रस्त्यावर रांगोळी काढून फुलांची कमान तयार करून बँड लावून जेसीबीच्या (JCB) साह्याने सकाळी नऊच्या दरम्यान येथे फुलांनी स्वागत करण्यात आले
यावेळी पोलिसांचा कडे कट बंदोबस्त पाहायला मिळाला!
तसेच दुपारचे स्नेहभोजन व थोडी विश्रांती घेतल्यानंतर, येथील जवळपासच्या खेड्यापाड्यातील भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे (Shri Sant Gajanan Maharaj Palkhi) दर्शन घेतले. यावेळी परिसरात काही वेळ भक्तीमय वातावरण निर्माण होऊन काय मृदंगांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. 56 वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत गजानन महाराज शेगाव येथील ते श्री छत्र माझे माहेर पंढरी असलेल्या भेटण्यास चाललेल्या वारकऱ्यांचे भाविक भक्तांनी (Devotee) जागोजागी अल्पहार, चहापाणी, पानाचाविडा, बिस्कीटचे पूडे व तसेच काही वस्तू यावेळी वारकऱ्यांना दिल्या जातात. काही ठिकाणी तर वारकऱ्यांचे पाय धुवून स्वागत सुद्धा केले जाते. पालखीमध्ये नेहमीप्रमाणे हत्ती घोडे व तसेच श्री संत गजानन महाराजांची मूर्ती रथावर पहावयास मिळाली. पान कनेरगाव येथून विश्रांती घेतल्यानंतर 1 च्या सुमारास महाराजांची पालखी शेणगाव कडे प्रस्थान झाली आहे 12 जून रोजी सेनगाव येथे मुक्कामी राहणार असल्याची माहिती आहे.