Aundha Nagnath :- तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पाणलोट क्षेत्रासह हिंगोली जिल्ह्यातील विविध भागा मागील काही दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणात प्रचंड मोठी पाण्याची आवक होत आहे तसेच येलदरी धरणातून (Dam)हे पाण्याचा विसर्ग येत असल्याने सिद्धेश्वर धरणाचे दिनांक २३ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता सर्व चौदा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात ३७ हजार ६०५ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा सिद्धेश्वर धरण पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात दिला आहे