बामणी (Heavy Rain) : सिरोंचा – आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात नियोजनाचा अभाव असल्याने काल १६ मे रोजी आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर सिरोंचा ते रेपनपल्ली दरम्यान महामार्ग जाम होऊन मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशी तसेच वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. यामुळे कंत्राटदार तसेच महामार्ग विभागाच्या अधिकार्यांच्या नावे संताप व्यक्त केला जात होता.
गेल्या कित्येक महिण्यापासून सिरोंचा – आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र काम करतांना नियोजन न करता मन मानेल तसे काम केले जात आहे.या महामार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांचा विचारही केला जात नसल्याचे दिसुन येत आहे. गेल्यावर्षीच्या पावसाळयात नागरीकांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा चांगलाच फटका बसला होता. यावषी तरी (Heavy Rain) पावसाळयापुर्वी आवागमन करण्यासाठी स्थिती चांगली राहील अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.
यावर्षी एप्रिल महिण्यापासूनच अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे (Heavy Rain) रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसात रस्त्यावरील मुरून टाकून गिट्टी न टाकता तसेच दुसर्या ठिकाणी कामाला प्रारंभ करत असून मुरूम टाकलेल्या ठिकाणी चिखल होऊन अनेक वाहन धारक घसरून पडले असून अनेक लोकांना मार लागला. काही लोकांचे हात पायही तुटले.
यामुळे मोठया प्रमाणात वाहतुक ठप्प पडली होती. ही बाब वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर चिखलात गिट्टी टाकून देण्याची विनंती केली. (Heavy Rain) तात्काळ गिट्टी पसरविण्यात आली व एक ते दोन तास अडकून पडलेल्या वाहनांना सुरळीत मार्ग काढून देण्यात आला. यामुळे तीन तास थांबुन असलेल्या प्रवाशांनी सरपंचचे आभार मानले. यावेळी सरपंच आत्राम यांनी ठेकेदाराला पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याची तंबी दिली व असा प्रकार घडल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला.
जिल्हाधिकारी यांनी सबंधितांची जबाबदारी निश्चित करावी
सिरोंचा – आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरून रायपूर ते हैद्राबाद पर्यंत अवजड वाहतुक चालते. या महामार्गावरून अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. या महामार्गाचे बांधकाम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे.गेल्या वर्षीच्या पावसाळयात जिल्हाधिकारी यांनी अधिसुचना काढून सिरोंचा – आलापल्ली मार्ग अवजड वाहनासाठी बंद केला होता. (Heavy Rain) पावसाळा संपल्यानंतरही नियोजनबद्ध कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे आता आलेल्या अवकाळी पावसामुळे या महामार्गाने ट्रेलर दाखविला असून पावसाळयाच्या दिवसात पुर्ण पिक्चर दाखविण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी या महामार्गाचे बांधकाम वेळेवर व गुणवत्तापुर्वक होण्यासाठी सबंधितांची जबाबदारी निश्वित करावी अशी मागणी होत आहे.