एकाचे नाव वगळले…
परभणी (Gangakhed fraud Case) : गंगाखेड येथे आडत दुकानावरील धान्य विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दलालानेच २९६ क्विंटल गव्हाची परस्पर विक्री करून ७ लाख ९१,८०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी (Gangakhed fraud Case) दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपीना बुधवार ९ जुलै रोजी गंगाखेड न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून एकाचे नाव गुम्ह्यातून वगळण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणीच्या गंगाखेड शहरातील मधुरा ट्रेडिंग कंपनी मालक तुकाराम कातकडे यांचे धान्य विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दलाल हरजी संभाजी राजागोरे रा. पिंपळगाव ता. अर्धापुर जि. नांदेड १८ मार्च २०२५ रोजी ७ लाख ९१८०० रुपयांचे २९६ क्विंटल गहू एमएच २६ बीई ९५९७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून घेवुन जात त्याची परस्पर विक्री करून पैसे न दिल्याने परभणीतील आडत व्यापारी तुकाराम प्रल्हाद कातकडे वय ३२ वर्ष रा. झोला ता. गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ७ जुलै रोजी रात्री उशिराने दलाल हरजी संभाजी राजगोरे, ट्रक चालक अक्षय केंद्रे व अन्य एकाविरुद्ध ७, ९१, ८०० रुपयांची फसवणूक केल्या (Gangakhed fraud Case) प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल होताच मंगळवार ८ जुलै रोजी तपास अधिकारी शिवाजी सिंगणवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, पो. शि. परसराम परचेवाड आदींनी नांदेड येथून दलाल हरजी संभाजी राजागोरे रा. पिंपळगाव ता. अर्धापुर जि. नांदेड, ट्रक चालक अक्षय रमेश केंद्रे रा. रमणेवाडी ता. लोहा जि. नांदेड व बालाजी व्यंकटराव जाधव रा. डी मार्ट रोड नांदेड या तिघांना ट्रकसह ताब्यात घेऊन गंगाखेड येथे आणले. यातील बालाजी व्यंकटराव जाधव यांचा गुन्ह्यात सहभाग नव्हता असा लेखी जबाब फिर्यादीने दिल्याने त्यांना नोटीस बजावून मुक्त करत १) हरजी संभाजी राजागोरे, ट्रक चालक अक्षय रमेश केंद्रे यांना बुधवार ९ जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याचा पुढील तपास सपोनि शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.
नांदेडमधील व्यापाऱ्यांच्या अंतर्गत बेबनावाने गुन्हा दाखल
गंगाखेड येथील व्यापाऱ्याचा गहू परस्पर विक्री करून सुमारे ८ लाख रुपयांची (Gangakhed fraud Case) फसवणूक केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याला नांदेड येथील धान्य व्यापाऱ्यांतील बेबनावाची किनार असल्याची व एका मोठ्या धान्य व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून फिर्यादीने हा गुन्हा दाखल केल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात होत होती.