११ लाख पॅकेट्सची मागणी
दोन लाख २४ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन
वर्धा (Cotton seeds) : खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. आगामी काळात पिकांची लागवड तसेच पेरणीला देखील सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून बियाणे तसेच खतांची नियोजन करण्यात आलेले आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशी (Cotton seeds) तसेच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सहा लाखांवर कपाशी बियाण्याचे पॅकेज उपलब्ध असल्याची माहिती आहे. पुढे आणखी बियाणे उपलब्ध होणार आहे.
वर्धा जिल्ह्यात चार लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीचे नियोजन आहे. त्यामध्ये भुईमुंग, संकरित ज्वारी, तूर, मुंग, उडीद, सोयाबीन, तिळ, कापूस, मका आणि इतर पिकांचे नियोजन आहे. जिल्ह्यात सोयाबीन तसेच कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तसेच तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड असते. यावर्षी दोन लाख २४ हजार ९५० हेक्टरवर (Cotton seeds) कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. त्याकरिता बियाण्याची मागणी देखील नोंदविण्यात आलेली आहे.
तसेच सोयाबीनची एक लाख ३८ हजार ६४० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी होण्याचा अंदाज आहे. तर ६०६७० हेक्टर क्षेत्रात तुरीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. लागवडीच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून बियाण्यांच नियोजन देखील करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात (Cotton seeds) कपाशीच्या ११ लाख २४ हजार ७५० पॅकेट बियाण्याची मागणी आहे. त्यातील ६ लाख ६० हजार २४० पॅकेट बियाणे उपलब्ध झालेले आहे. तसेच सोयाबीन, तूर आदी बियाणदेखील उपलब्ध झाले आहे.