अनेक घरांची पडझड, धानपिकांचेही मोठे नुकसान
बारव्हा (Heavy Rain) : भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांची पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर शेतात पावसाचे पाणी साचल्याने धान पर्हे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून (Heavy Rain) पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले तुडूंब भरल्याने अनेक मार्गही बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील विरली/बुज. गावात पावसामुळे (Heavy Rain) पाच घरांची पडझड झाली असून कुडेगाव येथेही एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात वच्छला सावरकर, विमला थेर, मनोज शेंडे, जनार्धन राऊत, श्रावण बनसोड, रा. सर्व विरली / बुज. येथील घर पडलेल्या नागरिकांची नावे आहेत. गावात पडझड झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत विरली / बुज. ग्रामपंचायतचे सदस्य लोकेश भेंडारकर यांनी पडलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार व संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व संबंधित अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली.
दरम्यान दि. ८ जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील ५ मंडळात झालेल्या (Heavy Rain) पावसाची नोंद घेण्यात आली असून सर्वाधिक पावसाची नोंद भागडी मंडळात २१४.५ मि.मी. झाली आहे. विरली मंडळात १७४.२ मि.मी., लाखांदूर मंडळात ११०.६ मि.मी., मासळ १४२.६ मि.मी. तर बारव्हा येथे १६६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून घराची पडझडही झाली आहे. तर शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने धान पिकासह अन्य पीक पाण्याखाली आल्याने शेतकर्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
मागील तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे विरली / बुज. येथील पाच घरांची पडझड झाली आहे. यात जनार्धन राऊत यांचे घर पूर्णतः कोसळले आहे. त्यामुळे या पाच घरांची पडझड झालेल्या कुटुंबियांना शासनाने राहण्याची सोय करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच शेतकर्यांच्या शेतात पाणी (Heavy Rain) साचून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकर्यांना सुद्धा सरसकट आर्थिक मदत करावी.
-लोकेश भेंडारकर, किसान क्रांती संघटना अध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य विरली / बु.