Karanja Snake Bite :- राहत्या घरी एका ४५ वर्षीय महिलेस सर्पदंश (snakebite) झाला.ही घटना ३ जुलै गुरुवार रोजी सकाळी ६ .३० वाजताचे दरम्यान मानोरा तालुक्यातील धानोरा गुरव येथे घडली. वंदना विजय वानखडे (४५ वर्ष )असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव असून ती धानोरा गुरव येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार सदर महिला गुरुवारी सकाळी घरी असताना तिला सर्पदंश झाला.
उपचारादरम्यान प्रकृती गंभीर असल्याचे आले निदर्शनास
त्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (Hospital)दाखल केले. परंतु उपचारादरम्यान प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती (Amravati) येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून सर्पदंशाच्या घटनात मोठी वाढ झाली असून घरी किंवा शेतात असताना सापा बाबत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.




