परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कडसावंगी येथील घटना बोरी पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद…!
परभणी (Snakebite Woman Death) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील झोपेतच सर्पदंश (Snakebite Woman Death) झाल्याने ४० वर्षीय महिलेला उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. सदर प्रकरणी २८ जुलैला बोरी पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत महिला ही जिंतूर तालुक्यातील कडसावंगी येथील आहे. पांडूरंग पुर्णे यांनी खबर दिली आहे. मिना पांडूरंग पुर्णे (वय ४० वर्ष) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत ह्या खबर देणार्याच्या पत्नी आहेत. मिना पूर्णे यांना झोपेत सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. या (Snakebite Woman Death) ठिकाणी डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. प्रकरणाचा तपास पो.ह. कोकाटे करत आहेत.
विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या
परभणी : नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याने लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २८ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास परभणी शहरातील गजानन नगर भागात उघडकीस आली. उध्दव शिंदे यांनी खबर दिली आहे. ऋषीकेश शिंदे (वय २० वर्ष) असे मयताचे नाव आहे. नवा मोंढा पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो.ह. गुरसुडकर करत आहेत.