Parbhani :- परभणीच्या मानवत तालुक्यातील आटोळा येथील शिवारात सोमवार ५ मे रोजी अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे (Hurricane) दत्ता मुंजाभाऊ करडले यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे (Solar energy panel) मोठे नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकसान भरपाई देण्याची दत्ता करडले यांची मागणी
मानवत तालुक्यातील आटोळा शिवारातील दत्ता मुंजाभाऊ करडले यांच्या ६३ या गट नंबर मधील शेतातील सोमवारी ५ मे रोजी अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे सोलार पंपच्या प्लेटचे मोठे नुकसान झाले असून काही प्लेट उडून गेल्या आहेत.शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या उडून गेलेल्या सौर ऊर्जा प्लेटची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आटोळा येथील दत्ता मुंजाभाऊ करडले यांच्याकडून केली जात आहे